महाराज बसवेश्वर, छत्रपती संभाजी महाराज जयंती व रमजान ईद निमित्त अन्नदान सुरु

0
229

पिंपरी, दि. १५, (पीसीबी) – बसवेश्वर महाराज, छत्रपती संभाजी महाराज जयंती व रमजान ईद निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमतः माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाच्या सर्व क्रीडा शिक्षकांनी आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी ,अशा ठिकणच्या रेल्वे स्टेशन येथे एकूण दहा दिवस अन्नदान करण्याचा मदतीचा हात पुढे केला आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे, संपुर्ण राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील गोरगरीब नागरीकांना लॉकडाऊनच्या काळात उपासमार होत आहे, उपासमार होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर जाऊन येत्या १० दिवस मोफत अन्नदान करण्याचा निर्धार शिक्षक महामंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर व अध्यक्ष फिरोज शेख यांनी मांडली, या उपक्रमात सर्व शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. किमान ५०० लोकांना आपण अन्नदान करु शकतो असा विश्वास यावेळी मांडण्यात आला. १४ मे ते २४ मे २०२१ या कालावधीत सायं ६ वाजता अन्नदान करण्यात येणार आहे.

यासाठी महामंडळाचे सचिव महादेव पफाळ ,हनमंत सुतार, सुजाता चव्हाण, रफिक इनामदार, चंद्रकांत पाटील, किर्ती मोटे, अर्चना सावंत ,उमा काळे, राजू माळी , पोपट माने ,विष्णुपंत पाटील, बाळासाहेब हेगडे ,निळकंट कांबळे, प्रतिमा शितोळे, हर्षदा नळकांडे ,राम मुदगल ,आशिष मालुसरे ,राजा प्रसाद ,मनीषा पाटील,अजित गायकवाड, रवि पिल्ले, निखिल पवार आदी क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.