Desh

महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याची पाकिस्तानात मोडतोड

By PCB Author

August 12, 2019

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – पाकिस्तानातील पंजाब प्रांतावर चाळीस वर्षे राज्य करणाऱ्या १९ व्या शतकातील महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याची पाकिस्तानात दोन जणांनी मोडतोड केली. किल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मोडतोड करणाऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या रागातून ही मोडतोड करण्यात आली.

नऊ फूट उंचीचा हा पुतळा ब्राँझचा असून त्याचे अनावरण लाहोर किल्ल्याजवळ जूनमध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या १८० व्या पुण्यतिथीला करण्यात आले होते. महाराजा रणजित सिंह यांचा १८३९ मध्ये मृत्यू झाला होता. पुतळ्याची मोडतोड केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या रागातून ही मोडतोड करण्यात आली. अटक करण्यात आलेले तेहरिक लाबाइक पाकिस्तान या मौलाना खादीम रिझवी याच्या संघटनेचे आहेत. लाहोर प्राधिकरणाने या घटनेबाबत खेद व्यक्त केला असून ईदनंतर पुतळ्याची दुरूस्ती करणार असल्याचे म्हटले आहे.