महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मनसेचा खळखट्याक

0
370

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका स्टँडअप शो दरम्यान जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जोशुआचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून अनेक शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यानंतर मनसेनंही या विरोध केला असून त्यांच्याकडून संबंधित स्टुडिओची तोडफोड करण्यात आली.

मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून संबंधित स्टुडिओची तोडफोड करण्यात येत असल्याचं दिसत आहे. तसंच यश रानडे हे जोशुआला लिखित स्वरूपात माफीदेखील मागण्यास सांगत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर अग्रिमा जोशुआ हिनं लिखित स्वरूपात माफीनामाही सादर केला आहे. जोशुआच्या या व्हिडीओवरून सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्या मुलीने ज्या स्टुडिओत अपशब्द वापरले, तो स्टुडिओच मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी फोडला!