Pune

महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रावहिनी पवार यांची गाईगुरांच्या ओढीतून गोठ्यात धाव..!

By PCB Author

April 27, 2024

दि,- २७ एप्रिल – वारजे येथे गाईचे हंबरणे एकूण बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी गोठ्यात जाऊन गाईची पाहणी केली. स्वतः शेतकरी म्हणून शेतातील सर्व प्रकारची कामे केलेल्या आणि गाई म्हैस पालन करून डेअरी चालवलेल्या सौ सुनेत्रावहिनी पवार यांनी शेतीची स्वतःची आवड या कृतीतून दर्शवली. यावेळी भाजपचे आमदार भीमराव अण्णा तपकीर व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.