महामार्गावर थांबलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू

0
222

पिंपरी दि. २३ (पीसीबी) – मुंबई बेंगलोर महामार्गावर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रक पार्क केला. या ट्रकला एका दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजता मुंबई-बेंगलोर महामार्गावर व्हिजन मॉल समोर वाकड येथे घडला.

सचिन किसान बोईर (रा. वळवंती, पो. करंजगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकिस्वाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार तानाजी टकले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार केशव वामण जाधव (वय 53, रा. उजनी, ता. माढा, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव याने त्याचा ट्रक मुंबई बेंगलोर महामार्गावर व्हिजन मॉल समोर, वाकड येथे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर पार्क केला. या ट्रकला सचिन बोईर याच्या दुचाकीची मागून धडक बसली. या अपघातात सचिन बोईर यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक केशव जाधव याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव येलमार तपास करीत आहेत