महाबळेश्वरमधील तीन पत संस्थावर दरोडा

0
426

महाबळेश्‌वर, दि. १४ (पीसीबी) – शहरात रात्रीच्या अंधारात धुके व पावसाचा फायदा घेत तीन पतसंस्थावर शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री दरोडा पडला आहे. मुख्य बाजारपेठ परिसरात अगदी पोलिस वसाहतीजवळ असणाऱ्या महात्मा फुले मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. या दरोड्यात चोरट्यांननी चार लाख रुपयांची रोकड लंपास केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

जनता नागरी सहकारी पतसंस्था, गोटेनीरा जननी माता बिगरशेती सहकारी पतसंस्था व साई नागरी सहकारी पतसंस्थेचा यांचा दरोड्यात समावेश आहे. या ठिकाणी असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये दोन चार हातामध्ये ब्लेड व बॅटरी घेत चेहऱ्याला रुमाल गुंडाळ्याचे दिसत आहे. त्यांच्या हातामध्ये एक्साब्लेड दिसून आले आहे. तीनही पतसंस्थांचे कुलूप कापून, फोडून चोरी झाली आहे. यामधील जनता नागरी सहकारी पतसंस्था, गोटेनिरा जननीमाता बिगरशेती सहकारी पतसंस्थातील रोकड लंपालस केली, तर साई नागरी पतसंस्थेत मात्र काहीच हाती न लागल्यामुळे फक्त कागदपत्रे इत्यादी वस्तू पसरल्या आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि श्वान पथकांसह ठसे तज्ञ्ज्ञांना पाचारण केले आहे. प्रथमच महाबळेश्वरमध्ये अशी घटना घडली असून प्रचंड खळबळ उडाली आहे.