Maharashtra

महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही

By PCB Author

November 18, 2019

मुंबई,दि.१८(पीसीबी) – मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज महापौर पदासाठी निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप पहारेकरीच्या भूमिकेत कायम राहणार असल्याचं समोर येत आहे.

सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर भाजप-शिवसेनेत सुरु असलेला सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप महापौर निवडणुकीत काय भूमिका घेते, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद तूर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाही.

भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढणार नाही. आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 2022 ला मुंबईत भाजपचा महापौर असेल, असं भाजपचे गटनेते आणि खासदार मनोज कोटक मनोज कोटक यांनी म्हटलं आहे.