महापालिकेच्या शाळेत महापौरांनी केले नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत  

0
578

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) –  महापालिकेच्या शाळा आजपासून (सोमवार) सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर राहुल जाधव यांनी जाधववाडी, कुदळवाडी आणि दिघी येथील शाळांना भेट देऊन नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

यावेळी महापौरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका अश्विनी जाधव, निर्मला गायकवाड, नगरसेवक लक्ष्मण उंडे, विकास डोळस, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते आनंदा यादव, साई जीवन शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड, लांगे आदी उपस्थित होते.