Bhosari

चिखली येथील महापालिकेच्या शाळेतील मुली पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या  

By PCB Author

August 27, 2019

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात हाहाकार उडाला. लाखो लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला. या पुरगस्त बांधवांना उभारी देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले.चिखली येथील महापालिकेच्या शाळेतील मुलींही पुरग्रस्तांसाठी धावून आल्या. त्यांनी संकलित केलेल्या अनेक वस्तू शिवमुद्रा प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन पुरग्रास्तांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. 

चिखली शाळेतील मुलींनीही आपाआपल्या परीने पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा  निर्णय घेऊन शालेय जीवनात दातृत्वाची प्रचिती आणून दिली. मुलींनी संसारोपयोगी साहित्य, धान्य, वस्तू संकलित करून चिखलीतील शिवमुद्रा प्रतिष्ठानकडे सुपुर्त केल्या.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ अद्यापही कायम आहे. महापुरात अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. जनावरे वाहून गेली. त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. पुरग्रस्तांचा संसार पुन्हा एकदा उभा करण्यासाठी संस्था, संघटना, व्यक्तींनी मदतीचा हात केला. आता चिखली शाळेतील मुलींही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा वाबळे सर्व शिक्षकवृंद तसेच ऋषिकेश मोरे, गोरख मोरे, सोपान मोरे, विलास मोरे, मनोज गोसावी, सागर आंबेकर, संकेत शिंदे, गणेश गायकवाड, शेखर गाढवे, अमोल कदम आदी उपस्थित होते.