महापालिकेचे सहायक आयुक्त आण्णा बाधडे कोरोना बाधित

0
189

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – कोरोनाचा प्रसार सुरू झाल्या पासून दिवसरात त्या कामासाठी सतत कार्यरत असलेले महापालिकेचे सहायक आयुक्त आण्णा बोधडे, महापालिकेच्या आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ.गोफणे तसेच विभाग प्रमुख डॉ. अनिल रॉय यांचे स्विय सहायक अजय चौधरी कोरोना बाधित झाले असल्याचे समजते. महापालिकेतील अधिकारी- कर्मचारी असे सुमारे ३५ जणांना कोरोनाची बाधा झाली. महापालिकेच्या यशवंराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचील अनेक डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय यांनाही कोरो नाची बाधा झाली, पवण बहुतेक सर्वजण त्यातून सुखरूप बाहेर आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सर्व कामकाज बाजुला ठेवून प्रशासन धावपळ करते आहे. कोरोना रुग्णांची तसेच क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची निवास व भोजन व्यवस्था सांभाळण्याचे काम आण्णा बोधडे यांच्याकडे होते. गेले साडेतीन महिने ते दिवसरात्र त्या कामातच व्यस्त आहेत. त्यांच्या कार्यालयातील एक लिपीक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर कुटलिही लक्षणे नसताना खबरदारी म्हणून बोधडे यांनी तपासणी करून घेतली असता त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. ते तत्काळ जिजामाता रुग्णालयात दाखल झाले. त्यांची तब्बेत सुधारत असून दोन दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. गोफणे हेसुध्दा कोरोनाच्या पथकावर सतत कार्यरत असतात. त्यांनाही बाधा झाल्याने वैद्यकीय पथकात थोडी अस्वस्थता निर्माण झाली आहे.