महापालिकेचे बनावट ओळखपत्र बाळगुन सरासपणे वावरणाऱ्या तरुणास अटक

0
2048

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर्मचारी असलेले बनावट ओळखपत्र तयार करुन महापालिका भवनात सरासपणे वावरणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळ करण्यात आली.

संदेश रामचंद्र जाधव असे अटक करण्यात आलेल्या या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरक्षा विभागप्रमुख उदय जरांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश हा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मजूर म्हणून असलेले ओळखपत्र घालून सरासपणे महापालिका भवनात वावरत होता. बुधवारी तो महापालिका भवनात प्रवेश करणार होता. इतक्या तेथील सुरक्षारक्षकांना त्याचा सशंय  आला. त्यांनी त्याची चौकशी करुन ओळखपत्र पाहिले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. तसेच तो पालिकेत कोणत्याही विभागात कामास नसल्याचे आढळून आले. यावर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन पिंपरी पोलिसाच्या हवाली केले. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी देखील संदेश याने पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून प्रवेश केला होता. त्यावेळी त्याला समज देऊन सोडून देण्यात आले होते. त्याने चिंचवड येथील एका व्यक्तीकडून पालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचे कबूल केले आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.