Maharashtra

महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टिस करत नाही, ज्यांना जमत नसेल त्यांनी घरी जावं’ – आयुक्त तुकाराम मुंढे

By PCB Author

April 02, 2020

 

मुंबई, दि.२ (पीसीबी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांची शाळा घेतली. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे अवस्था पाहून मुंढे यांना संताप आल्याने त्यांनी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली.

‘महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टिस करत नाही, ज्यांना जमत नसेल त्यांनी घरी जावं’ अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी वॉर रुममध्येच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झापले. तसेच लॉकडाउनचे पालन योग्यरित्या होत नसल्यानं प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचे पालन न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल. असा इशाराही मुंढे यांनी दिला होता.

करोनाविरूद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागानं सज्ज राहावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच प्रशासनातली गोपनीय माहिती बाहेर पडत असल्याबाबत मुंढे यांनी नाराजीही व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी तुकाराम मुढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केले होते.