Pimpri

महापालिका सभा आता ‘ऑफलाईन’

By PCB Author

September 25, 2021

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा यापुढे ‘ऑनलाईन’ नव्हे तर ‘ऑफलाईन’ होणार आहे. राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागाचे कक्ष अधिकारी हितेंद्र दुफारे यांनी त्याबाबतचा लेखी आदेश आठ दिवसांपूर्वीच (१७ सप्टेंबर) महापालिका प्रशासनाला पाठविला आहे.

कोरोना आपत्ती मध्ये महापालिका सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचे बंधन होते. गेले सहा महिने राज्य सरकारच्या आदेशानुसार सभेचे कामकाज ऑनलाईन सुरू होते. दरम्यान, कोरोनाचे संकट निवळल्याने या सभा ऑफलाईन घेण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसवेकांनी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनते राजू मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे परवानगीबाबतचा आदेश कऱण्याची विनंती केली होती. पुणे महापालिकेच्या सभा प्रत्यक्ष नगरसेवकांच्या उपस्थित होत असताना पिंपरी चिंचवडबाबत वेगळा निर्णय का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला होता.

मंत्रालयाचे कक्ष अधिकारी हितेंद्र दुफारे यांनी १७ सप्टेंबर रोजी त्याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाला पाठविले. प्रत्यक्षात त्यानंतर २० सप्टेंबरची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आली. ऑनलाईन सभेत कुठलिही चर्चा होत नाही की सदस्यांना आपले मत मांडता येत नाही, अशा असंख्य तक्रारी होत्या. अखेर सरकारने त्याबाबत निर्णय केला आणि कोरोनाचे संकट बऱ्यापैकी निवाळल्याने कोरोनाचे निकष पाळून ५० टक्के प्रत्यक्ष उपस्थितीत सभा घेण्याला परवानगी दिली आहे.