Maharashtra

महापालिका प्रशासनाची अतिक्रमण विरोधात जोरदार मोहिम सुरु..

By PCB Author

April 29, 2022

मोशी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधात जोरदार मोहिम उघडली असून शहरातील रस्ते, पदपथांवरच्या अवैध टपऱ्या, हातगाडी, पथारीचे सर्व अतिक्रमण काढायला सुरवात केली आहे. आज मोशी, बोऱ्हाडेवाडी, लांडेवाडी या ‘क’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण कारवाई करण्लायात आली.

बो-हाडेवाडी, इलेक्ट्रॉनिक सदन लांडेवाडी येथील १८ टपऱ्या ,३७ पत्राशेड इत्यादी वर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली व बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट,निवृत्ती गुणवरे, शितल भोसले, साधना ठोंबरे इ. सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.