Banner News

महापालिका निवडणूक ‘या’ तारखांपूर्वीच होणार ..

By PCB Author

May 10, 2022

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – राज्यातील महापालिकेच्या निवडणुका केव्हा होणार याकडे तमाम राजकिय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका नकोत असे सर्व राजकिय पक्षांचे नेते सांगत असले तरी प्रशासक नियुक्ती नंतर सहा महिन्यांच्या आत या निवडणुका पार पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेवर १२ मार्च रोजी प्रशासकाची नियुक्ती कऱण्या आली. न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिने मुदत म्हणजे १२ सप्टेंबर च्या आतच निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. त्यातच आता पावसाळा सुरू होईल आणि लगेचच जूनमध्ये पालखी सोहळा आणि ३१ ऑगस्ट पासून गणेशोत्सव आहे. अशा परिस्थितीत एकतर २० जून पूर्वी किंवा ३१ ऑगस्ट पूर्वीच या निवडणुका घेणे सोयिचे आहे, असे सुत्रांनी सांगितले.

महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको म्हणून राज्य सरकारने १२ मार्च पासून प्रशासकाची नियुक्ती केली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्यात आठवड्यात आदेश दिले आणि दोन आठवड्यात निवडणुकिच्या तारखा जाहीर कऱण्याचे आदेश दिले. त्यानुसार येत्या आठवड्यात त्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात निवडणुक घेणे अशक्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र दिले असले तरी प्रशासक नियुक्तीपासून सहा महिन्यांच्या आत म्हणजे १२ सप्टेंबरच्या आत निवडणका घ्यायच्या आहेत. गणेशोत्सव ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर आहे. गणेशोत्सव काळात निवडणूक घेणे अशक्य आहे याचाच अर्थ ३१ ऑगस्ट पूर्वीचीच निवडणूक तारख काढणे गरजेचे आहे. ११ ऑगस्टला नारळी पौर्णिमा असते. पौर्णिमा झाल्यानंतर समुद्राचे पाणी ओसरते आणि मासेमारी सुरू होते. त्यामुळे ऑगस्ट अखेरच्या तारखा सोयिच्या आहेत. २० जून पासून राज्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा सुरू होतो, तो पुढचे महिनाभर चालतो. किमान ३० प्रमुख संतांच्या पालख्यांतून सुमारे १० लाख वारकरी पंढरीकडे प्रस्थान ठेवतात. त्यामुळे २० जून ते २० जुलैच्या दरम्यानच्या तारखासुध्दा सोयिच्या दिसत नाहित. याचाच दुसरा अर्थ २० जून पूर्वी किंवा ३१ ऑगस्ट पूर्वी निवडणूक घेणे सोयिचे असणार आहे. राज्यात २७ महापालिका आहेत. नऊ महापालिकांची मूदत संपली आणि तिथे प्रशासक नियुक्ती कऱण्यात आली त्याला तब्बल दीड ते दोन वर्षे होत आलीत. आता पहिल्या टप्प्यात त्या महापालिकांच्या निवडणुका तातडिने होतील असा अंदाज आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी चिंचवड सह १८ महापालिकांवर प्रशासक नियुक्ती मार्च २०२२ मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका एकदम न होता टप्प्यात होतील. आता कोणत्या निवडणुका केव्हा घ्याव्यात याबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेचा तपशिल हाती आलेला नाही, मात्र ऑगस्ट पूर्वीच या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत या निवडणुका दोन-अडिच महिन्यांत होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्य निवडणूक आयोगाची तयारी, न्यायालयाचे आदेश, राजकिय पक्षांची तयारी पाहता निवडणुका ऑक्टोंबर मध्ये नाहीत तर ऑगस्ट पूर्वीच होतील, असे दिसते.