महापालिका निवडणूक ‘एससी, एसटीसाठी’ प्रभाग लोकसंख्येच्या टक्केवारीवर राखीव

0
331

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून आता प्रतिक्षा आरक्षण सोडत कधी होणार त्याची आहे. महापालिकेची 139 नगरसेवक संख्या असणार आहे. तर, एकूण 46 प्रभाग असणार आहेत. अनुसूचित जाती (एससी) साठी 22 तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) 3 जागा राखीव आहेत. 114 जागा सर्वसाधारण गटासाठी असतील. अनुसूचित जातींसाठी संभाव्य 22 प्रभागातील जागा राखीव राहू शकतात. हे आरक्षण लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार उतरत्या क्रमाणे असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी 16 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे 139 सदस्यांच्या महापालिका सभागृहात 22 सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी 11 असणार आहे. तर, अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग 41, 44 आणि 6 हे प्रभाग आरक्षित असतील. त्यातील 41 आणि 44 या दोन प्रभागात एससी, एसटी दोन जागा राखीव राहतील. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील एका जागेसाठी मोठी चुरस होणार आहे.

संभाव्य ज्या प्रभागात अनुसूचित जातीसाठी 22 जागा राखीव असणार आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत.

 

प्रभाग क्रमांक परिसर
एकूण लोकसंख्या
अनुसूचित जाती लोकसंख्या अनुसूचित जाती %
२९
भाटनगर – मिलिंदनगर
39036
16508
४२.२९
१९
चिंचवड स्टेशन – मोहननगर
33916
11571
३४.१२
२०
काळभोर नगर – विद्यानगर
36588
11482
३१.३८
२२
ओटा स्कीम – निगडी गावठाण
37738
11495
३०.४६
४३
दापोडी – गणेशनगर
39266
11134
२८.३६
११
इंद्रायणीनगर – बालाजीनगर
38313
8950
२३.३६
३७
ताथवडे – पुनावळे – कालाखडक
32664
7209
२२.०७
१८
मोरवाडी – अजमेरा – गांधीनगर
38244
7999
२०.९२
२४
मामुर्डी -किवळे – रावेत
38779
8023
२०.६९
३४
बापुजीबुवानगर – श्रीनगर
34085
6871
२०.१६
१६
नेहरूनगर – विठ्ठलनगर
35424
6950
१९.६२
३५
थेरगाव – बेलठिकानगर
34957
6666
१९.०७
१७
वल्लभनगर – फुलेनगर – एच.ए कॉलोनी
34150
6342
१८.५७
४४
पिंपळे गुरव – राजीवगांधीनगर
40032
7011
१७.५१
३९
पिंपळे निलख – कावेरीनगर
39652
6742
१७.
३२
तापकीरनगर – ज्योतिबानगर
33584
5701
१६.९८
४६ जुनी सांगवी – ममतानगर 46979 7919 १६.८६
४१
सुदर्शननगर- वैदूवस्ती
34071
5653
१६.५९
१४
यमुनानगर – त्रिवेणीनगर – कृष्णानगर
35711
5813
१६.२८
चिखली
32161
5209
१६.२
२५
वाल्हेकरवाडी – गुरुद्वारा
39531
6375
१६.१३
३८
वाकड
34873
5581
१६