महापालिका आणि शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत – आमदार लक्ष्मण जगताप

0
762

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या योजनांपासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या शैलेजा मोरे, आशा धायगुडे-शेंडगे, हिरानानी घुले, माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, आरती चौंधे, सारीका सस्ते, निर्मला कुटे, आश्विनी जाधव, मनिषा पवार, निता पाडाळे, मिनल यादव, साधना मळेकर, शर्मिला बाबर तसेच नगरसदस्य नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, अॅड.मोरेश्वर शेंडगे, माऊली थोरात, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, संदीप खोत, कार्यकारी अभियंता सतिष इंगळे, मुख्य व्याख्याते रेवन्ना कर्डीले, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “ज्याला वाचता येते त्याला साक्षर म्हणतात. ज्याला वाचता येत नाही त्याला निरक्षर म्हणतात. परंतु ज्याला ऐकमेकांच्या भावना कळतात त्यालाच खरा माणूस म्हणतात. शहरातील दिव्यांगांना कोणत्याही योजनेपासून व कोणत्याही सोयी सुविधेपासून वंचित राहू दिले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.”

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रमुख व्याख्याते रेवन्ना कर्डीले, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.      राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत दिव्यांग व्यक्तींचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. यामध्ये प्रेरणा सहाणे (दिक्षीत), जयश्री राजगोपालन, विलास मोरे, पृथ्वीराज इंगळे, सुजाता पवार, वसंत भिसेकर, शामकांत नांगरे, विश्वनाथ घमोडे, सुनंदा डावखर, दिनेश मालशे, मोहन डिगोळे, मंगेश पुंडे, महेंद्र साकळे, योगिता तांबे, भानू नाडर आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आभार मानले.