महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना ‘बायोमेट्रीक थम्ब’पासून सवलत..

0
221

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत 31 जानेवारी 2022 पर्यंत ही सवलत देण्याचे आदेश प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी काढले आहेत.

 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा (ओमायक्रॉन) प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन, फेस रिडींगसाठी कामाच्या वेळेत हजेरी नोंदविण्यासाठी बायोमेट्रीक मशिनसमोर कर्मचा-यांची गर्दी होत आहे. त्यामुळे कर्मचा-यांना कोरोना विषाणूची लागण होऊन प्रसार होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने बचावात्मक उपाय म्हणून अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन, फेस रिडिंग प्रणालीतून 31 जानेवारी 2022 पर्यंत सवलत देण्यात आली.

अधिकारी, कर्मचा-यांना हजेरी पत्रकावर दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. त्यावर संबंधित आहरण-वितरण अधिका-यांनी स्वाक्षरी करुन नोंदी प्रमाणित कराव्यात. तसेच कार्यालयीन वेळेपेक्षा उशीरा येणा-या व लवकर कार्यालय सोडणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर पूर्वीप्रमाणेच रजा खर्ची टाकण्याची कारवाई केली जाणार आहे.