Chinchwad

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवाधिकार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

By PCB Author

December 08, 2018

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे  राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन,  पुणे जिल्हा अध्यक्ष सुभाष कोठारी, खजिनदार  ओमकार शेरे, जनसंपर्क अधिकारी लक्ष्मण दवणे, संघटक मुनिर शेख, खेड तालुका अध्यक्ष सुर्यकांत दवणे, पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष संतोष शेटे आदी उपस्थित होते.