महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

0
467

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाने यासंबंधी निर्णय दिला आहे. 

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यानंतर महाधिवक्त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. याबाबतची घोषणा राज्य सरकारने नुकतीच केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांशी संबंधित सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयात राज्याची न्यायप्रविष्ठ बाजू मांडण्यासाठी महाधिवक्त्यांची नियुक्ती केली जाते. पहिल्यांदाच न्यायिक बाजू पाहणाऱ्या व्यक्तीला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आहे.