महादेव जानकर म्हणतात, मी ‘भाजप’चा नाही; मात्र, भवितव्य अमित शहांच्या हाती

0
652

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – धनगर समाजाचे नेते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांच्या आमदारकीचा निर्णय सर्वस्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे गेला आहे. त्यांचा निर्णय सोमवारी १२ वाजेपर्यंत होईल, अशी माहिती भाजपतील सूत्रांनी दिली.

विधानसभा सदस्यांतून परिषदेत निवडून द्यावयाच्या ११ जागांची १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. भाजपकडे ५ सदस्य निवडून देण्याइतपत संख्याबळ आहे. मात्र, जानकर यांनी भाजपच्या एबी फाॅर्मवर निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार देत, रासपच्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली आहे. जानकर यांच्यावरचा दबाव वाढावा यासाठी ऐनवेळी भाजपने सहावा उमेदवार दिला आहे. जानकर यांना स्वबळावर परिषदेवर निवडून यायचे असेल तर विधानसभेत त्यांना २७ आमदारांची मते हवीत. पण, विधानसभेत त्यांच्या रासप पक्षाचा एकच आमदार आहे. जानकर यांनी रासपच्या एबी फाॅर्मवर उमेदवारी दाखल केली आहे, ती भाजपला पसंत नाही. आमच्या एबी फाॅर्मवर उभे राहा, असा भाजपचा आग्रह होता. जानकर यांच्या हट्टाला वैतागलेल्या भाजपने आता अमित शहा यांच्याकडे बोट केले आहे. त्यामुळे जानकर सध्या अधांतरी आहेत.