Desh

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिवादन

By PCB Author

October 02, 2019

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विजयघाट येथे जाऊन लाल बहादुर शास्त्रींनाही अभिवादन केले. यावेळी लाल बहादुर शास्त्री यांचे चिरंजीव अनिल शास्त्री उपस्थित होते.

दरम्यान, संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. महात्मा गांधींनी सांगितलेला स्वच्छतेचा संदेश पाळत आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करत नागरिक अनोख्या पद्धतीने गांधींना अभिवादन करत आहेत.