महाजनादेश यात्रेत गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल

0
826

बारामती, दि. १७ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीतील महाजनादेश यात्रेत गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्षांसह ५ ते ६ कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद केला आहे.   

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ओंकार कैलास सिताप यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार बारामती शहर राष्टवादी काँग्रेस युवक पार्टीचे अध्यक्ष अमर धुमाळ, सागर खलाटे यांच्यासह  पक्षाच्या ५ ते ६ अनोळखी कार्येकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी बारामतीत आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना आरोपींनी बेकायदा गर्दी जमवली आणि मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याची तक्रार करण्यात आली होती.