महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या क्रांतीगाथा प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
446

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त नेहरूनगर येथील पद्मश्री वसंतदादा पाटील माध्यमिक शाळेत तसेच महेशनगर येथील प्रथमेश हायस्कूलमध्ये क्रांतिकारकांची माहिती असलेले क्रांतीगाथा प्रदर्शन भरवण्यात आले होते.

अनेक क्रांतिकारकांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी इंग्रजांशी लढा दिला. आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा क्रांतिकारकांच्या त्यागाची व शौर्याची आठवण विद्यार्थ्यांना व्हावी व विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम व देशाभिमान जागृत होऊन वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचे आयोजन महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेचे कार्यकर्ते विश्वनाथ अवघडे, सुभाष अंभोरे, शशिकला अवघडे यांनी केले. या उपक्रमासाठी वसंतदादा माध्यमिक शाळेचे संस्थापक माजी महापौर हनुमंत भोसले व शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता काळे यांनी सहकार्य केले. दोन्ही शाळेच्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहिले. प्रथमेश हायस्कूलच्या संस्थपिका कल्पना पोतदार, मुख्याध्यापक संभूस तसेच शिक्षकांनी सहकार्य केले.