मसूद अझहरची सुटका करण्याचा निर्णय सोनिया गांधी, मनमोहनसिंगांना मान्य होता – अमित शहा   

0
477

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – देशाच्या भावनेचा विचार करुन त्यावेळी सर्वपक्षांनी मिळून मसूद अझहरची सुटका करण्याचा आणि प्रवाशांना परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. याबाबत तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग दोघेही उपस्थित होते, अशी आठवण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना करून दिली आहे.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका कोणी केली ? असा प्रश्न   राहुल गांधी यांना केला होता. याला अमित शाह यांनी आपल्या ब्लॉगमधून काही गोष्टींची आठवण करुन देत उत्तर दिले आहे.   ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची होती.  त्यामुळे मसूद अझहरची सुटका का केली ? हा प्रश्न उपस्थित करुन दुर्देवाने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत, शहा यांनी  म्हटले आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडी दोनच्या कार्यकाळात २०१० साली २५ दहशतवाद्यांची  सुटका  करण्यात आली होती. त्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी देशाला सांगावे. सुटका केलेल्या दहशतवाद्यांपैकी शाहीद लतीफ या दहशतद्याचा पठाणकोट हल्ल्यात सहभागी होता,  असा दावा अमित शहा यांनी  करून या मुद्दयावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप शहा यांनी केला.