मसाप च्या कार्यक्रमात “सरीवर सरी” बरसल्याही आणि रंगल्याही……….

0
290

पिंपरी,दि.19 (पीसीबी) : सोहळा सजला निसर्ग सुंदरीचा
आला प्रेमऋतू चिंब ओल्या सरींचा
प्रेमऋतू दर्शवणार्या या ओळी आहेत कवयित्री जयश्री श्रीखंडे यांच्या.
तर
निळ्या आभाळी कृष्ण मेघ घनगर्द दिसावा
तुझ्या सवे भिजण्यास एकदा पाऊस हवा

या ओळीमधून प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची आतुरता दर्शविणारे कवी आहेत जुन्नरचे जयसिंग गाडेकर.
अशा एकाहून एक सरस कवितांच्या पावसात रसिक चिंब चंब न्हाऊन निघाले.
निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित या आषाढ महिन्यातील # सरीवर सरी # या कविसंमेलनाचे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवी, गीतकार प्रकाश होळकर यांनी भुषविले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मसाप पुणे जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब पवार व मसाप धुळे जिल्हा प्रतिनिधी डॉ. शशिकला पवार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, उपाध्यक्ष डॉ रजनी सेठ, कार्यवाह संजय जगताप उपस्थित होते.
रंगत गेलेल्या या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड सोबत पुणे, सोलापूर, सातारा, ठाणे, सांगली, मुंबई येथील कविंनी सहभाग घेतला. ज्येष्ठ कवी माधव पवार, अपर्णा मोहिले, अनघा पाठक, महादेव हवालदार (सांगली), सुरेखा कटारिया, किशोर पाटील, रंजना सानप (सातारा) मोहन जाधव , श्वेता कुलकर्णी, मारुती कटकधोंड, शिल्पा गायकैवारी, विनीता श्रीखंडे, सुरेखा हिरवे , रमाकांत श्रीखंडे, भारती मेहता, स्नेहल येवला (ठाणे), प्रतिभा गारटकर या कविंनी पावसाचे विविध रंग उलगडून दाखविनार्या सरस तसेच सुरस कविता सादर करुन रसिकांना वर्षा ऋतूचा आनंद दिला.

प्रकाश होळकर, रावसाहेब पवार व डॉ. शशिकला पवार यांनी मनोगते व्यक्त केली.
राजन लाखे यांनी प्रास्तविक केले. विनीता ऐनापुरे यांनी आभार मानले. माधुरी मंगरूळकर यांनी सुत्रसंचालन केले.