मिशन २०१९; उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी, बसपा आणि राष्ट्रीय लोक दलाची आघाडी ?

0
789

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे.  उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा आणि राष्ट्रीय लोक दल (रालोद) या पक्षांनी आघाडी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चारही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत झाले आहे. सर्वाधिक ४० जागा बसपाला देण्यात आल्या आहेत. तर काँग्रेस ८ जागा लढवणार आहे.   सपाच्या कोट्यातून रालोदला जागा देण्याचे सपाने मान्य केल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशात भाजपच्या विरोधात या चार पक्षांनी गोरखपूर-फुलपूर आणि कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत जी   रणनिती वापरली होती. त्या रणनितीचा राज्यभरात पुन्हा वापर करण्याची तयारी केली आहे. गोरखपूर आणि फूलपुर पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि बसपाच्या सहकार्याने विजय नोंदवला होता. तर कैरानामध्ये रालोदच्या उमेदवाराने विजय मिळवला होता.

दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मध्यप्रदेशातही सपा आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे. मायावतींना राज्यात २३० पैकी ५० जागा लढवायच्या आहेत. पण काँग्रेसने २२ जागांची ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे. या पक्षाचे नेतेही बसपाला ३० पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाहीत.