Maharashtra

मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला – नाना पाटेकर

By PCB Author

October 09, 2018

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनतर आज पहिल्यांदाच नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच आपल्या वकिलाने कोणत्याही चॅनेलशी न बोलण्याचा सल्ला दिला आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मी दहा वर्षांपूर्वीही स्पष्टीकरण दिले होते. १० वर्षापूर्वी जे बोललो होतो तेच खरे आहे. त्यात आज काय बदल होणार आहे? असा सवालही नाना पाटेकरांनी विचारला आहे. शिवाय माझ्या वकिलाने मला कोणत्याही चॅनेलशी बोलण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मी आता यावर काही बोलू इच्छित नाही. नाहीतर चार दिवस अगोदरच मी बोललो असतो. वेळ आल्यावर मी सगळ्यांशी एकत्र बोलेन, असेही नाना पाटेकरांनी स्पष्ट केले आहे.