मला रामदास आठवलेंच्या रिपाइंमध्ये प्रवेश करायचाय – एकनाथ खडसे

0
980

नागपूर,दि.१९(पीसीबी) – भाजपचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत आहेत. खडसे यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. यावर खडसे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत.

मी राष्ट्रवादी नाही तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) या पक्षात जाण्यास इच्छुक आहे. यासाठी मी रामदास आठवलेंकडून परवानगी घेणार आहे, अशा कोपरखळ्या खडसे यांनी दिल्या आहेत.

मी कुणालाही भेटण्यास तयार आहे. राष्ट्रवादीत जायचं का नाही याबाबत निर्णय घेतला नाही. मात्र रामदास आठवलेंच्या पक्षात जाण्याचा मी निर्णय घेऊ शकतो, असं खडसे गमतीने म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.