मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न, विचारपूर्वक मतदान करा; अशोक चव्हाणांचे मतदारांना भावनिक आवाहन

0
835

नांदेड, दि. १५ (पीसीबी) – भाजप सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न  केला जात आहे.  त्यामुळे  विचारपूर्वक मतदान करा, असे भावनिक  आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि   नांदेड लोकसभेचे उमेदवार  अशोक चव्हाण यांनी  मतदारांना केले आहे.

नांदेडमधील भोकरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की,  सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस असलेल्या  मतदारसंघातील विकास कामे रोखत आहेत. सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी तुमचा आहे, मी तुमच्यातच राहणार आणि तुमच्यातच मरणार, असे भावूक उद्‌गार चव्हाणांनी काढले.

पक्षातील एखादा कार्यकर्ता चुकीचे वागत असेल, तर मी निवडणुकीनंतर त्यांना शिक्षा करेन, पण तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर काढू नका, त्यांच्यावरील रागाची शिक्षा मला देऊ नका, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी  केले.  दरम्यान, चव्हाण यांच्याविरोधात भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे.