मला मुख्यमंत्री होण्यास आवडेल – ज्योतिरादित्य सिंधिया

0
837

भोपाळ, दि. १२ (पीसीबी) – मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि तरुण नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दरम्यान सिंधिया यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे म्हटले आहे. त्यामुळे  काँग्रेससमोर नवा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीने या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मात्र, काँग्रेस नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करून  पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या पार्श्वभूमीवर  एका वृत्तवाहिनीशी बोलताना  सिंधिया यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे म्हटले आहे.  तसेच त्यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेसला दिलेल्या  पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.