Maharashtra

“मला मीटरचोर विनायक राऊतांची खरी लायकी माहिती आहे; नेते ह्याला हड तुड करतात”

By PCB Author

September 24, 2020

मुंबई,दि.२४(पीसीबी) – माजी खासदार निलेश राणे भाजपचे आउटडेटेड झालेले नेते आहेत. आज तर त्यांनी एक मोठा जावई शोध लावला आहे. अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली होती याला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवर निशाणा साधला आहे.

मीटरचोर खासदार विनायक राऊत याची गल्लीत आणि शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असे त्याला वाटते. शिवसेनेचे पहिल्या क्रमांकाचे नेते ह्याला हड तुड करतात आणि दरवाज्यावर पण उभा करत नाही. माझ्यावर विनायकचा राग मी समजू शकतो कारण मला त्याची खरी लायकी माहिती आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मावसभाऊ निशाण देशमुख यांनी नाणार प्रकल्पाच्या भागातील 1400 एकर जमीन विकत घेतली असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता.

मीटरचोर खासदार विनायक राऊत याची गल्लीत आणि शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असे त्याला वाटते. शिवसेनेचे पहिल्या क्रमांकाचे नेते ह्याला हड तुड करतात आणि दरवाज्यावर पण उभा करत नाही. माझ्यावर विनायकचा राग मी समजू शकतो कारण मला त्याची खरी लायकी माहिती आहे.

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 24, 2020