Maharashtra

मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी झेंडा बदलावा लागत नाही – उद्धव ठाकरे

By PCB Author

February 10, 2020

मुंबई,दि.१०(पीसीबी) – मला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. शिवसेना कधीही झेंड्याचा रंग बदलणार नाही. एक माणूस एक झेंडा हे आमचं ठरलेलं आहे. जगाला माहिती आहे आमचं हिंदुत्व काय आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई मध्ये भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेना आमदारांची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली म्हणजे आम्ही हिंदूत्व सोडलं असं होत नाही. मरेपर्यंत भगवा सोडणार नाही, असं ते म्हणाले आहेत.