Desh

मला मतदान करा, नाहीतर श्राप देईन- साक्षी महाराज

By PCB Author

April 13, 2019

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – उन्नाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेल्या साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मी एक संन्याशी आहे. मला मतदान करा. जर मला मतदान केले नाही तर मी तुम्हाला श्राप देईन, असं वादग्रस्त विधान साक्षी महाराज यांनी केलं. त्यांच्या या वादग्रस्त विधानाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी एक संन्याशी आहे. मतांची भीक मागण्यासाठी तुमच्या दारापर्यंत आलो आहे. जर एका संन्यासाला तुम्ही मतदान केले नाही तर तुमच्या घरातून मी पुण्य घेऊन जाईन आणि तुम्हाला श्राप देऊन जाईन, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. उन्नाव मधील एका प्रचार सभेत ते बोलत होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उन्नाव सोहरामऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी महाराज यांनी याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. निवडणुकीला उभ्या असलेल्या साक्षी महाराज यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी याआधीही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उन्नाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी १०० हून अधिक गाड्या नेल्या होत्या.