Maharashtra

मला दुखापत झाल्याचे कळताच महाराष्ट्र पेटवण्याचे काम बाळासाहेबांनी केले – शरद पवार

By PCB Author

January 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – महाराष्ट्र- कर्नाटक  सीमाभागात मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पुढाकार घेण्याची संधी मला शिवसेना प्रमुख दिवंगत  बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती, त्यात मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचे काम बाळासाहेबांनी केले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

साध्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्याला मोठे करण्याचे स्वप्न बाळगणारे बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व होते, असेही गौरवोद्गार  शरद पवार यांनी काढले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील पहिल्याच सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे,  असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे बेधडक होते, त्यांचे मत ते स्पष्टपणे मांडायचे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.’ ठाकरे’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर  शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.