Maharashtra

‘मला तुमच्याशी बोलायचं’; राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंहांची भाजप प्रवेशाची चाचपणी   

By PCB Author

August 29, 2019

उस्मानाबाद, दि. २९ (पीसीबी) –  ‘मला तुमच्याशी बोलायचं’,  असे कार्यकर्त्यांना आव्हान करणारी एक पोस्ट राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी टाकून ३१  ऑगस्टला परिसंवादाचा कार्यक्रम ठेवला आहे. ही पोस्ट जिल्ह्यात चर्चेची विषय ठरली  आहे.  

उस्मानाबादेत आलेल्या  शिवस्वराज्य यात्रे कडेही पद्मसिंह पाटील व आमदार राणा जगजितसिंह  या पितापुत्रांनी  पाठ फिरवली होती. त्यामुळे  आमदार राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा  सुरू झाली होती.  त्यानंतर आता त्यांनी एक नवीन पोस्ट टाकल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहेत.

सोलापुरात १ सप्टेंबरला भाजपच्या महाजनादेश यात्रेसाठी भाजपाध्यक्ष  अमित शहा  उपस्थित राहणार आहे. यावेळी  पद्मसिंह पाटील व  आमदार राणा जगजितसिंह  भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर  त्यांनी आपल्या फेसबुकवर  पोस्ट  टाकली  आहे.  आता ३१ ऑगस्टला या परिवार संवाद मध्ये कार्यकर्ते काय निर्णय देणार ?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.