Desh

मला जर रावण म्हणाल, तर कायदेशीर कारवाई करेन – चंद्रशेखर आझाद

By PCB Author

September 17, 2018

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – माझा कुणीही रावण म्हणून उल्लेख करू नये, मला जर रावण म्हणाल तर कायदेशीर कारवाई करेन, असा इशारा भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे. २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

१६ महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आलेल्या चंद्रशेखर आझाद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा इशारा दिला आहे. सध्या तरी मला सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच चळवळ सुरू ठेवायची  आहे. त्यामुळे २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मी कोणत्याही पक्षाची बाजू घेऊ शकत नाही. मला प्रामाणिक आणि पारदर्शी राहणे आवश्यक आहे, असे चंद्रशेखर म्हणाला.

मला रावण नावाने संबोधण्यास सुरुवात केली आहे. मला हे नाव नको आहे. माझा नांव  चंद्रशेखर आझाद आहे. याचा नावाने मला बोलवले पाहिजे. त्यामुळे मला जर कोणी रावण नावाने बोलवत असेल, तर मी त्याच्याविरोधात कारवाई करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.   आपल्याला अवमानित करण्यासाठी भाजपकडून रावण नावाचा वापर सुरू आहे, असाही आरोपही त्यांनी केला आहे.