मराठ्यांची गौरवगाथा महानाट्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौकात यशस्वीरीत्या पार पडला

0
645
मळवली, दि.२४ (पीसीबी) – प्रविण देशमुख लिखित, दिग्दर्शित, मराठ्यांची गौरवगाथा या महानाट्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौकात दिनांक १८/०२/२०२० व १९/०२/२०२० आयोजन करण्यात आले होते.
दोन मजली भव्य रंगमंचावर, सुमारे २५० कलाकार घोडे, उंट, बैलगाडी, नेत्रदीपक आतिषबाजी असे या महानाट्याचे आकर्षण होते, छत्रपती शिवाजी महाराज पुर्व काळ, शिवजन्मापासुन राज्याभिषेक व छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेक ते संभाजी राजेंचे बलिदान असा महानाट्याच्या कथेचा सारांश आहे. दोन महानायकांचा एकत्र धगधगता  इतिहास पिंपरी चिंचवड करांनी व आकुर्डीकरांनी अनुभवला.
शिवदुर्ग सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रविण देशमुख, अजय शेलार, कौस्तुभ भोसले व सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विषेश प्रयत्न केले .

महनाट्याविषयी बुकिंग  व माहितीसाठी संपर्क

प्रविण देशमुख – 9637619127