Maharashtra

मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीसाठी १०० हून अधिक केसेस राज ठाकरेंनी अंगावर घेतल्या

By PCB Author

January 23, 2020

मुंबई, २३ (पीसीबी) – बाळासाहेबांच्या जयंती चे औचित्य साधून गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसे ने महाअधिवेशना चे आयोजन के ले आहे. या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपल्या झेंड्या चे अनावरण के ले . त्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थितांना संबोधित के ले आहे.

बोलताना अभ्यंकर म्हणाले , पक्ष स्थापन झाल्यानंतर आपल्या अनेक संघटना स्थापन झाल्या , प्रत्येक संघटने ने उल्लेखनीय अशी कामं केलेली आहेत. पक्ष फक्त १३ वर्षांचा आहे , पण जनतेच्या राज ठाकरे आणि आपल्याकडून प्रचंड जास्ती अपेक्षा आहेत. मराठी भाषा , अस्मिता आणि संस्कृतीसाठी १०० हून अधिक केसेस राज ठाकरेंनी अंगावर घेतल्या असल्याचा दावा अभ्यंकर यांनी केला.