मराठीतून बोलण्यास सांगितल्याच्या रागातून डिलेवरी बॉयने तरुणीच्या चेहऱ्यावर केले वार

0
629

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मराठीतून बोलण्यास सांगितल्याच्या रागातून एका कुरियर डिलेवरी करणाऱ्या तरुणाने दोन तरुणींवर हल्ला चढवत एकीच्या चेहऱ्यावर पेनने वार केला. ही घटना आज (शुक्रवार) शिवाजी पार्क पोलिस ठाणे आणि शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुकृपा इमारतीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुकृपा इमारतीमध्ये सुजिता पेडणेकर आणि विनीता पेडणेकर या दोघी राहतात. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुरियर घेऊन आलेल्या कुरियर बॉयला या युवतींनी मराठीत संवाद साधण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने या तरुणाने शिवीगाळ करत एका युवतीच्या चेहऱ्यावर पेनाने वार केला तर, दुसरीच्या डोक्यात ठोसा लगावला. या तरुणींनी स्थानिकांच्या मदतीने आरोपी कुरियर बॉयला पकडून शिवाजी पार्क पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सध्या सुरु असून आरोपी तरुण हा बांगलादेशी असल्याचे समजते.