Entertainment

मराठीतील या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी देणारे गजाआड

By PCB Author

October 22, 2020

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मराठी अभिनेत्रीला दिपाली सय्यदला गेल्या वर्षभरापासून खून आणि बलात्काराची धमकी मिळत होती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गेली एक वर्षे हा आरोपी दिपालीला फोनवरून धमकावत होता.

2019 मध्ये नगरमध्ये दिपालीने पाणी प्रश्नावरून आंदोलन छेडलं होतं. तेव्हा संदीप वाघ याने दिपाली यांचा फोन नंबर मिळवला. आणि त्यानंतर तिला धमकीचे फोन करण्यास सुरुवात केली.

सतत फोन करत असल्याने दिपालीने संदीपचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या फोनवरून फोन करण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टीबाबत दिपालीने तिच्या भावाला कल्पना दिला.