“मराठीचं वाकडं करण्याची कोणाचीही हिंमत नाही”

0
476

मुंबई,दि.२७(पीसीबी) – “मराठीचं वाकडं करण्याची कोणाचीही हिंमत नाही. आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते?” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. विधानभवनात ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

“भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतीत भावनेनं मराठी भाषा दिन साजरा करू नका,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

“जेव्हा जेव्हा आपल्यावर संकंट आली तेव्हा मदतीसाठी मराठी धावून आली आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानही ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही भाषा मराठी होती. परकीय आक्रमाणावेळीही मराठी धावून गेली होती?,” असं ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मराठी बाबत बोलताना त्यांनी आपल्या मातोश्री मीना ठाकरे यांची आठवण काढली. “मी शाळेत असताना माझी आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती, असंही ते म्हणाले.