मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार; सदाभाऊ खोतांना विश्वास  

0
748

पुणे, दि. १ (पीसीबी) – ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. तसेच मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केला.

सदाभाऊ खोत पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण हे ओबीसींवर अन्याय करणारे नाही. काही घटनातज्ञ सांगत आहेत की न्यायालयात आरक्षण टिकणार नाही. पण सरकारकडे असलेल्या दस्तावेजनुसार हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आज आरक्षणासंदर्भातील अधिसूचनाही जारी झाली आहे. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात स्थगिती मिळू नये, यासाठी राज्य सरकारने न्यायालयीन लढाईची तयारी केली आहे. आरक्षणाची अधिसूचना काढतानाच न्यायालयात कॅव्हेट दाखल करून स्थगिती टाळण्याची योजना आखली आहे.