मराठा  आरक्षण देताना एससी, एसटी, ओबीसी यांच्यावर अन्याय नको – छगन भुजबळ   

0
1122

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  मराठा समाजाला आरक्षण देताना  एससी, एसटी, ओबीसी यांच्यावर  अन्याय  होता कामा नये. मराठा आरक्षणासाठी  कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास ती करण्यात यावी.   राज्य  घटनेत त्याबाबत  तरतूद करण्यात यावी, अशी मागणी  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  छगन भुजबळ यांनी केली.

संसदेत मराठा  आरक्षण विधेयक मंजूर  करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद  पवार सहकार्य करायला तयार आहेत. मराठा  आरक्षणासाठी आंदोलन  करताना  आत्महत्या, हिंसाचार याचा वापर करून नये, असे भुजबळ म्हणाले.

तसेच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करू नये. विनाकारण तुरुंगात टाकलेल्या कार्यकर्त्यांना  सोडण्यात यावे, असे भुजबळ म्हणाले.  मागासवर्ग आयोगाचा अहवालानंतर कायद्यात बदल करण्याची  गरज  असेल तर ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. आम्ही सर्व त्यास सहकार्य करण्यास तयार आहे,  असेही भुजबळ म्हणाले.