मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच ; काँग्रेसचे भारत भालके यांचा राजीनामा  

0
517

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपचे नाशिकमधील देवळा- चांदवड मतदार संघातील आमदार डॉ. राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांतर आता काँग्रेसच्या भारत भालके यांनी राजीनामा दिला आहे.

मंगळवेढा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ‘मराठा, धनगर, मुस्लिम आणि महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आपण राजीनामा देत आहोत, असे भारत भालके यांनी म्हटले आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाची मागणी करत आमदार रमेश कदम यांनी राजीनामा दिला. रमेश कदम हे सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघाचे आमदार आहेत.

दुसरीकडे, औरंगाबादचे भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, कन्नड मतदारसंघातील शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही मराठा आरक्षणाची मागणी करत यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे.