मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल बुधवारी, गुरूवारी विधीमंडळात सादर होणार

0
503

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकार विधीमंडळात  सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी (दि. २८) विधानसभेत तर  गुरुवारी (दि.२९)  विधानपरिषदेत हा अहवाल  सादर करणार असल्याची शक्यता सूत्रांकडून समजते.

राज्य सरकार बुधवारी अॅक्शन टेकन रिपोर्ट म्हणजे अहवालासंदर्भातील भूमिका मांडणार आहे. तर तोच अॅक्शन टेकन रिपोर्ट गुरुवारी विधानपरिषदेत सादर केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. अहवालाच्या शिफारशीनुसार, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार असल्याचे सांगितले जात आहे.

तर, आरक्षणाच्या अहवालावर बुधवारी, गुरुवारी चर्चा करु, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (सोमवार) म्हटले आहे. दरम्यान, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारल्यानंतर तो तातडीने सभागृहात मांडण्याची मागणी विरोधकांनी  सातत्याने लावून धरली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.