मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल होणार; राज्य सरकारची कसोटी

0
544

मुंबई, दि. २ (पीसीबी) –  मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा १ डिंसेबरपासून  राज्यात लागू झाला आहे. या आरक्षणाविरोधात सोमवारी (दि.३)  उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. अॅड्‌. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंबेडकर ऍडव्होकेट असोसिएशन आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनलीस्ट कॉन्सिलच्या वतीने ही याचिका दाखल केली जाणार आहे.