मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

0
375

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मराठा आरक्षणावर बुधवारी (दि.२१) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आपले म्हणणे मांडावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढण्यात यावा, या मागणीसाठी विनोद पाटील यांनी आज (सोमवारी) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, न्या. धर्माधिकारी आणि न्या. कोतवाली यांच्या न्यायालयाने यावर बुधवारी सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा अहवाल याचिकर्त्यांनाही मिळावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.