मराठा आरक्षणाबाबत राजकारण करणाऱ्यांची नावे योग्य वेळी सांगणार – नारायण राणे

0
1299

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – कोणत्याही कायदेशीर अडचणी नव्हत्या, तरीही आरक्षण रोखण्यात आले, असे सांगून  राणे समितीने अहवाल दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर त्यामध्ये राजकारण झाले. नवीन सरकार आले आणि काही पेच निर्माण करण्यात आले, असा आरोप राणे समितीचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी  केला आहे.

त्यावेळी काही लोकांनी राजकारण करत आरक्षणाला विरोध केला, काही लोकांना न्यायालयात पाठवले. न्यायालयात जाणारे कोण आहेत? सर्वांची चौकशी केल्यावर ते दिसून येतील, असेही राणे म्हणाले. ज्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यात राजकारण केले त्यांची नावे योग्य वेळ आल्यावर सांगणार आहे, असेही ते म्हणाले.

आमच्या समितीचा अहवाल आम्ही कायदेशीर कक्षेत राहूनच दिला. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबींचे सर्वेक्षण करूनच आम्ही अहवाल दिला होता. आम्ही १८ लाख कुटुंबाचा सर्व्हे केला होता, मागासवर्गीय आयोगाने ४५ लाख कुटुंबाचा सर्व्हे केला आहे. त्यामुळे यात आणि आमच्या सर्व्हेत वेगळे असे काही नसेल, त्यामुळे आरक्षण देणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.