मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रावेत, वाल्हेकरवाडीत कडकडीत बंद

0
534

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रावेत येथे दुकाने बंद करून सरकारचा निषेध करण्यात आला. रावेत परिसरासह वाल्हेकरवाडीतील सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शांततेच्या मार्गाने बंद पाळण्यात आला. तर तरूणांनी दुचाकीवरून रॅली काढली.     

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून  सकाळी साडे अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पुढे बालगंधर्व रंगमंदिर चौक, पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूने पुढे शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या येथे समारोप करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन ठेवण्यात आले.